Friday, 11 January 2013

मी













आयुष्याच्या पुस्तकाची पाने उलगडून बघ,
अनुक्रमनिकेच्या  यादीत एक महत्वाचा मुद्दा 'मी' असेन.

सुखांच्या सावलीत जेव्हा विसावा घेत असशील,
वर बघ, तुला सावली देणारे झाड 'मी' असेन.

रात्रीच्या मंद प्रकाशात आकाशाकडे बघ,
चंद्र 'तू' आणि लुकलुकणारा लहानसा तारा 'मी' असेन.

संकटांच्या वादळआत हरवून जेव्हा जाशील,
तुला सावरून घेणारी नौका 'मी' असेन,

कल्पनेच्या जगातून आता खऱ्या विश्वात ये,
तुझे स्वप्न आणि अस्तित्व यांना जोडणारी दुवा 'मी' असेन.

सेलफोन चा इंबॉक्स खालून वर चाचपडून बघ,
प्रत्येक मेसेज च्या शब्दातला अर्थ 'मी' असेन.

ओर्कुट ची स्क्रपबुक मागून पुढे चाळून बघ,
तूला पाठवलेल्या कवितेतली भावना 'मी' असेन.

अजूनही विचार करतेस 'मी' आहे तरी कुठे?
जिथून सोडून गेली होतीस तिथे ये,
तुझी वाट बघत उभा 'मी' असेन.

"शब्द माझे बोलके"
-  गौरव श्रावगे 

0 comments:

Post a Comment