Featured Article
Latest Post

Friday 11 January 2013

मी













आयुष्याच्या पुस्तकाची पाने उलगडून बघ,
अनुक्रमनिकेच्या  यादीत एक महत्वाचा मुद्दा 'मी' असेन.

सुखांच्या सावलीत जेव्हा विसावा घेत असशील,
वर बघ, तुला सावली देणारे झाड 'मी' असेन.

रात्रीच्या मंद प्रकाशात आकाशाकडे बघ,
चंद्र 'तू' आणि लुकलुकणारा लहानसा तारा 'मी' असेन.

संकटांच्या वादळआत हरवून जेव्हा जाशील,
तुला सावरून घेणारी नौका 'मी' असेन,

कल्पनेच्या जगातून आता खऱ्या विश्वात ये,
तुझे स्वप्न आणि अस्तित्व यांना जोडणारी दुवा 'मी' असेन.

सेलफोन चा इंबॉक्स खालून वर चाचपडून बघ,
प्रत्येक मेसेज च्या शब्दातला अर्थ 'मी' असेन.

ओर्कुट ची स्क्रपबुक मागून पुढे चाळून बघ,
तूला पाठवलेल्या कवितेतली भावना 'मी' असेन.

अजूनही विचार करतेस 'मी' आहे तरी कुठे?
जिथून सोडून गेली होतीस तिथे ये,
तुझी वाट बघत उभा 'मी' असेन.

"शब्द माझे बोलके"
-  गौरव श्रावगे 

Wednesday 15 August 2012

असंच कधी पावसात चिंब भिजावं....



धुंद दाटलेल्या काळ्या ढगांकडे बघावं,
सावलीत त्यांच्या लहानश्या थेंबांना झेलावं,
कधीतरी छत्रीच्या सोबतीस मुकावं,
असंच कधी पावसात चिंब भिजावं....


















घराबाहेर पडून फेरफटक्यास निघावं,
भिजलेल्या रस्त्यांवर अनवाणी चालाव,
ओघळत्या पाण्याला पायांनी मनसोक्त तुडवाव,
असंच कधी पावसात चिंब भिजावं....















बाईकची कीक मारून एका लॉंग ड्राईवला निघावं,
सुसाट वेगात पावसाला अंगावर झेलावं,
टपरीवरच्या गरम गरम चहाचं सुख अनुभवावं,
असंच कधी पावसात चिंब भिजावं....

















हिरव्यागार निसर्गाचं सौंदर्य अनुभवावं,
पावसाचं 'टिप-टिप' संगीत ऐकावं,
पाण्याच्या त्या स्पर्शात सगळ काही विसरावं,
असंच कधी पावसात चिंब भिजावं....















"शब्द माझे बोलके"
- गौरव श्रावगे




वेळ बदलते, माणसं बदलतात पण आठवणी बदलत नसतात...


"चिमुकली पाउले जेव्हा लहाणाची मोठी होतात,
आईची ममता आणि वडिलांची छाया यांची जागा मित्र घेतात,
पण त्यानी दिलेले संस्कार मनात तसेच कायम राहतात,
वेळ बदलते, माणसं बदलतात पण ते संस्कार बदलत नसतात...

मित्रांच्या सहवासात आपण 'मित्र' म्हणून घडतो,
शिक्षकांच्या शिस्तीत आपण 'माणूस' म्हणून घडतो,
निखळ आणि निष्पाप मैत्रीचे ते धागे कायमचेच गुंफले जातात,
वेळ बदलते, माणस बदलतात पण ती नाती बदलत नसतात...

बालपणीची  ती नाजुक पाउले परखड तारुण्यात पडतात,
मित्र बदलतात, स्वप्न बदलतात, जगण्याच्या दिशासुद्धा बदलतात,
पण बालपणीचे ते मंतरलेले दिवस मनात नेहमीच 'अविस्मरनीय' असतात,
वेळ बदलते, माणसं बदलतात पण ते क्षण बदलत नसतात...

सोळाव्या वर्षातले ती तरुण पाउलं नकळतच प्रेमात पडतात,
विखुरलेल्या भावना मग एका/एकी भोवतीच फिरू लागतात,
प्रेमाच्या त्या अलगद प्रवासाच्या कहाण्या आठवणी बनून बसतात,
वेळ बदलते, माणसं बदलतात पण त्या भावना बदलत नसतात...

अचानक ती व्यक्ती दूर जाते, आयुष्याची गणितच बदलतात,
अफाट लोकांच्या गर्दीतही एकटे करून सोडतात,
पण तो/ ती च्या सोबतचे ते सुखद क्षण मनाच्या नेहमीच जवळ असतात,
वेळ बदलते, माणसं बदलतात पण आठवणी बदलत नसतात...

दुखांच्या त्या तापत्या उन्हात मग सावली काही मित्र देतात,
पडलेल्या चेहऱ्यावर, उदास ओठांवर हसू खुलवून जगण्याला पुन्हा बळ देतात,
स्वतःची दुःख विसरून आपल्या सुखासाठी झटणारी अशीही माणसं भेटतात,
वेळ बदलते, माणस बदलतात पण आठवणी बदलत नसतात...

आयुष्याच्या प्रवासात माणसं येतात आणि जातात,
काही सोडून जातात, काही जन्मभर साथ देतात,
प्रत्येकाची तऱ्हा वेगळी, प्रत्येकाच्या आठवणी वेगळ्या,
कधी हसवतात, कधी रडवत असतात,
तुमच्या - माझ्या - प्रत्येकाच्या आयुष्यात अशा घटना घडत असतात,
दुख विसरुन सगळेच हसत हसत जगत असतात,
वेळ बदलते, माणसं बदलतात पण या आठवणी मात्र बदलत नसतात..."



'शब्द माझे बोलके'
(मनातल्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा काव्यात्मक प्रयत्न...)
शब्दांकन - गौरव श्रावगे
Powered by Blogger.